- मंदिरात विशेष पूजा करून देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना
रामदुर्ग / वार्ताहर
बेळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचाराला हळूहळू वेग येऊ लागला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेट्टर मतदार संघातील विविध धार्मिक संस्था आणि मंदिरांना भेटी देऊन, आशीर्वाद घेत आहेत. आज शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी प्रचाराच्या निमित्ताने रामदुर्ग दौऱ्यावर असताना शेट्टर यांनी येथील वीरभद्रेश्वर मंदिरात जाऊन भगवान श्री वीरभद्रेश्वराची विशेष पूजा केली आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी त्यांचासह भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनाके, प्रधान सचिव भारती मुगदूम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, प्रमुख शंकर लमाणी, राजेश बिलागी, एस.बी. पाटील, रमेश देशपांडे, सिद्धू मेत्री, इराण्णागौडा बसनगौद्रा, शंकर हुरकडली, रसूल काझी, सुरेश डोल्लुर,हुवाप्पा न्यासर्गी, प्रकाश मुडोल,इराण्णा अंगडी, महंतेश चन्नाप्पगौद्र आदि उपस्थित होते.
- जगदीश शेट्टर यांनी घेतली भाजप नेते संजू शेट्टी यांची भेट :
लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून बेळगाव मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रामदुर्ग येथील भाजपचे नेते संजू शेट्टी यांच्या घरी भेट दिली. तसेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी आगामी निवडणुकीत रामदुर्ग मतदार संघातून मला पर्यायाने भाजपला उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, प्रधान सचिव भारती मुगदूम, जिल्हा सरचिटणीस के.व्ही. पाटील, मंडळ अध्यक्ष राजेश बिलगी, बेळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मान्यवर शंकर लमाणी, एस. बी. पाटील, बाळू होसमनी, सिद्दप्पावाडी, शेट्टेप्पा हुलगाठी, सिद्दप्पा पटोली,प्रकाश पवार, पत्रेप्पा मायाण्णावर व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments