खानापूर / प्रतिनिधी
दोन महिन्यापूर्वी जळगे येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह, जळगे-कारलगा जंगलात आढळला असून, मृतदेह झाडाला लटकलेल्या व गळफास घेतलेल्या स्थितीत आहे. मृतदेह संपूर्ण कुजलेला व सुकलेला आहे.
याबाबत माहिती अशी की जळगे येथील युवक जोतिबा जयदेव गुरव (वय 24) हा गेल्या दोन महिन्यापूर्वी घरातील लोकांशी. किरकोळ वाद झाल्याने न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या घरच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध येण्याचा प्रयत्न केला होता. सर्व सोशल मीडिया व वृत्तपत्रातून बातमी ही देण्यात आली होती. परंतु जोतिबा सापडला नाही.
आज कारलगा येथील एक शेतकरी जंगलात गेला असता, सदर मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत त्याला दिसून आला असता, त्याने याची माहिती गावात दिली. याची माहिती ज्योतिबाच्या नातेवाईकांना मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जोतिबा जयदेव गुरव याचाच मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर नंदगड पोलिसांना याची माहिती देण्यात आली असता, नंदगड पोलीस व भाजपाचे युवा नेते पंडित ओगले त्या ठिकाणी दाखल झाले. सदर गुन्ह्याची नोंद नंदगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पोलिसांनी जागेवर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात, आज सायंकाळी उशीरा आणला आहे. पुढील तपास नंदगड पोलीस करत आहेत.
0 Comments