बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव सांबरा विमानतळावर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसलेली दीड लाख रुपयांची रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली. जसवीर सिंग नावाचा व्यक्ती सांबरा विमानतळावरून २ लाख रुपये घेऊन दिल्लीला जात होता. यावेळी विमानतळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणी दरम्यान कागदपत्रांशिवाय पैसे असल्याचे आढळून आले. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोन लाखांची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. विमानात केवळ ५० हजार रुपयांची वाहतूक कारण्याची परवानगी असल्याच्या पार्श्वभूमीवर १.५० लाखांची रक्कम जप्त करून ५० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. निवडणूक भरारी पथकाच्या नेतृत्वाखालील पथकाने ही रक्कम जप्त केली. याप्रकरणी मारिहाळ पोलिस स्थनाकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.