बेळगाव : गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांच्या शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून उद्या रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मराठा मंदिर येथे कार्यकारणी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

शहर समितीच्या बैठकीत मदन बामणे यांना कार्यकारिणी निवडीचे आणि बैठक घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आले होते त्यानुसार या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.