नवी दिल्ली : सध्या २०२४ च्या आयपीएल हंगामाचा असून काउंटडाऊन सुरु आहे. येत्या २२ मार्च रोजी शानदार उद्घाटनासह यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
बीसीसीआयने गेल्या महिन्यात आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र केवळ सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित सामने कधी आणि कुठे होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आता दुस-या टप्प्यातील सामने भारताबाहेर अर्थात यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे बीसीसीआयने केवळ पहिल्या सहामाहीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयचे काही अधिकारी आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामने आखाती देशात हलवण्याची शक्यता तपासण्यासाठी यूएईमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीची तारीख आज शनिवारी (दि. १६ मार्च) रोजी जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
“निवडणूक आयोग शनिवारी (१६ मार्च) दुपारी ३ वाजता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर हे सामने दुबईला हलवायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआय घेईल. सध्या बीसीसीआयचे काही अधिकारी दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामने दुबईत खेळविण्याची शक्यता तपासण्यासाठी तिथे गेले आहेत, असे वृत्त 'त्या इंग्रजी दैनिकाने'ने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
काही फ्रँचायझींनी आधीच खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे, असे अहवालात म्हटले आहे. दि. २२ रोजी चेन्नई आणि आरसीबी संघांमध्ये सलामीचा सामना होणार आहे. पूर्वार्धाचा शेवटचा सामना ७ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
0 Comments