सुळगे (ये.) : येथील नेताजी हायस्कूलच्या  इ. दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार (दि. १४ मार्च) रोजी पार पडला. रामचंद्र एस. नंद्याळकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. यानंतर प्रमुख अतिथी बी. बी. पाटील, पी. जी. पाटील, एन. आर. पाटील, एस.डी. पाटील, भाऊराव होनगेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पी.वाय.कामती यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

प्रास्ताविक करताना हायस्कूलचे मुख्याध्यापक टी.वाय.भोगण यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शिक्षिका एस. वाय. व्हडेकर यांनी वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे अहवाल वाचन केले. याप्रसंगी इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. शिक्षकांच्या वतीने एम.पी. कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख अतिथी पी. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी हायस्कूलमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून जय संभाजी कुकडोळकर तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुसूम धनंजय इनामदार, उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमार समर्थ, आनंद थोरवत व  सानिया नारायण बोंगाळे यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर मागील वर्षातील इयत्ता १० वी, ९ वी आणि ८ वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी हायस्कूलचे माजी विद्यार्थी उद्योजक, समाजसेवक तसेच श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्सचे संस्थापक गोविंद टक्केकर आणि प्रमुख वक्ते एस.डी. पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन हायस्कूलच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समाजसेवक  गोविंद टक्केकर यांनी पुढील वर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांस अनुक्रमे रू.५००१/-, रू.२१००/- व रू.११००/-  बक्षिस जाहीर करून हायस्कूलसाठी ५० पोती सिमेंट देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र एस. नंद्याळकर यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी रू. १०००/- व ५००/- बक्षिस देण्याचा मानस केला.

यानंतर प्रमुख वक्ते एस.डी.पाटील मुख्याध्यापक संभाजी हायस्कूल बैलूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाने खचून न जाता जिद्दीने ध्येय प्राप्ती करावी, नियमित वाचन स्वतःच्या जीवनात घ्यावयाची दक्षता, आई-वडिलांचा सन्मान, शिक्षकांविषयी आदर, दैववादा पेक्षा प्रयत्नवादाला महत्त्व अशा अनेक उदाहरणांचा दाखला देत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष बी. बी. पाटील यांनी एकंदरीत शाळेच्या सर्वांगिण विकासाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.जे. पाटील यांनी तर आभार एस. एस. केंगेरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए. बी. पाटील, एस. एस. वाडकर, एस. एम. कांबळे, पी. के. झाजर्री, एन. एस. कुकडोळकर यांचे सहकार्य लाभले.