- एक जागीच ठार, पाच जण गंभीर जखमी
- हुबळी नुलवी क्रॉसजवळ घटना
हुबळी / वार्ताहर
जत्रेला जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात एक ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले. हुबळी तालुक्यातील नूलवी क्रॉसजवळ हुबळी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. इराप्पा नादूर असे अपघातातील मृताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, चेन्नापूर गावातील सहा जण एका ऑटोतून शिशुनाळ शरीफ जत्रेला जात होते. यावेळी नूलवी क्रॉसजवळ रिक्षाला कंटेनरने जोराची धडक दिली. परिणामी ऑटोमधील इराप्पा नादूर याचा मृत्यू झाला. तर अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये १०-१२ वयोगटातील दोन मुले आणि ३०-४० वयोगटातील तिघांचा समावेश आहे.त्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत.
दरम्यान हुबळी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0 Comments