विजयपूर / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयपूर जिल्ह्याच्या चडचण शहरातील धुळखेड चेक पोस्टवर अधिकृत कागदपत्रांविना   वाहतूक करण्यात येत असलेली, ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील रोशनगेट येथील गजानन कर्णाशे कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय (MH 20-FU- 2039) क्रमांकाच्या कारमधून  सदरची रक्कम घेऊन बेंगळूरला निघाले होते. यावेळी धुळखेड चेक पोस्टवर कार थांबवून तपासणी केली असता ही रक्कम आढळून आली.