- बेकायदेशीर कमाईचे आरोप आणि लोकांच्या तक्रारींकरून कारवाई
चिक्कोडी / वार्ताहर
भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांनी सकाळीच मोठा धक्का दिला आहे. निडगुंदी गावातील पीडीओ सदाशिव जयप्पा करगर यांच्या घरावर लोकायुक्तांनाही छापा टाकला आहे.
लोकयुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावच्या पिडिओवर बेकायदेशीर कमाईचे आरोप आणि लोकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला.
लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान काल खानापूरच्या पंचायत राज विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील लोकायुक्तांनी छापा टाकून मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पंचायत राज विभागाचे एईई डी.एम. बन्नुर यांचा घरावर आणि कार्यालयावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. आणि आज निडगुंदी येथे कारवाई करण्यात आली.
0 Comments