• बेळगाव ग्रामीणमधील देवस्थानांना भेटी देऊन घेतला आशीर्वाद 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवार (दि. २७) मार्च रोजी शहरात रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर आता बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या  ग्रामीण भागातील देवस्थानांना भेट देऊन शेट्टर यांनी जनतेचे कल्याण, देशाचे हित आणि आगामी निवडणुकीत यश मिळावे यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करून आशीर्वाद घेतला आहे. 

बुधवार दि. २७ ते रविवार दि. ३१ मार्च पर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील, सुळेभावी  श्री लक्ष्मी मंदीर, पंत बाळेकुंद्री पंत महाराज संस्थान, सांबरा गावातील श्री यल्लम्मा देवी मंदीर, निलजी येथील श्री ब्रह्मलिंग मंदीर, सौंदत्ती तालुक्यातील श्री यल्लमादेवी मंदिर, हुलीमठ, शिरसंगी श्री कालिकादेवी मंदीर बेनकट्टी श्री दुर्गादेवी मंदीर यासह विविध मंदिरांना भेट दिली आहे. 

  • ममदापूर गावातील  श्री बीरसिद्धेश्वर मंदिरात केली पूजा : 

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी ममदापूर गावात श्री बीरसिद्धेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली, गावातील नेत्यांची भेट घेऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. 

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पागोळ, माजी आमदार एम.एल.मुथन्नावर, प्रमुख लक्ष्मण तापसी, प्रमोद जोशी, मंडयप्पा घोलेप्पन्नावर आदि उपस्थित होते. उपस्थित होते.

  • हुलीकट्टी गावचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले : 


जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील हुलीकट्टी गावचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मागितले.


यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पागोळ, माजी आमदार एम.एल.मुथन्नावर, प्रमुख लक्ष्मण तापसी, प्रमोद जोशी, मंडयप्पा घोलेप्पन्नावर आदि उपस्थित होते. 

  • खनगाव येथील श्री खन्नगम्मादेवी मंदिरात देवीची विशेष पूजा : 




बेळगाव लोकसभा मतदारसंघातील खनगाव येथील श्री खन्नगम्मादेवी मंदिरात जाऊन जगदीश शेट्टर यांनी श्री खन्नगम्मादेवीची विशेष पूजा केली, गावातील ज्येष्ठांची भेट घेतली आणि भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. 


यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनाके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पागोला, माजी आमदार एम.एल.मुथन्नावर, प्रमुख लक्ष्मण तापसी, प्रमोद जोशी, मंडयप्पा घोलेप्पन्नावर आदि उपस्थित होते. उपस्थित होते.

  • अंकलगी येथील श्री आडसिद्धेश्वर महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले : 



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर जगदीश शेट्टर यांनी  बेळगाव लोकसभा मतदारसंघातील अंकलगी (ता. गोकाक, जि. बेळगाव)  येथील  श्री आडसिद्धेश्वर महास्वामी  यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.  यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष  अनिल बेनाके, ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष .सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष राजेंद्र गौडप्पागोळ, शहराध्यक्ष भीमाशी बाराप्पागोळ, मुरगेंद्रगौडा पाटील, बी.आर.कागल,मंड्यप्पा घोलप्पनवर, प्रमोद जोशी,  बसवराज पट्टणशेट्टी आदि उपस्थित होते.

  • बेनकट्टी श्री दुर्गादेवी मंदिराला भेट : 



जगदीश शेट्टर यांनी बेनकट्टी श्री दुर्गादेवी मंदिराला भेट देऊन मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक शक्ती देण्याचा संकल्प केला  याप्रसंगी पक्षाचे नेते विरूपक्षप्पा मामाणी, रत्ना मामणी, इराण्णा चंद्रगी, पुंडलिक मेटी, जगदीश कौजगेरी,  दावलसाब चाप्ती, के. व्ही. पाटील, सुनिल  मामाणी, ईश्वर रायना गौद्रा,  पुंडलिक उप्पार, मलतेश पंचन्नावर, कडप्पा वीरशेट्टी, उमेश दंडीन आदि उपस्थित होते.

  • मुनवळ्ळी - बैलहोंगल मठाच्या स्वामींचा घेतला आशीर्वाद : 


श्री सोमशेखर मठ, मुनवळ्ळी श्री मुरुगेंद्र महास्वामी आणि बैलहोंगल थुसाविर मठाचे श्री प्रभू नीलकांत महास्वामी यांचे जगदीश शेट्टर यांनी आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले. यावेळी इराण्णा चंद्रगी, सुभाष गड्डीगौडर, श्रीकांत मिरजकर, बाबू भजंत्री, विनोद बुर्जी यांच्यासह प्रमुख स्थानिक नेते, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मुनवळ्ळी येथील श्री पंचलिंगेश्वराची विशेष पूजा :

बेळगाव लोकसभा मतदार संघातील मुनवळ्ळी येथील श्री पंचलिंगेश्वर मंदिरात जाऊन जगदीश शेट्टर यांनी भगवान  पंचलिंगेश्वराची विशेष पूजा करून लोककल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.विरुपक्षप्पा मामानी, इराण्णा चंद्रगी, मालतेश पंचन्नवर, सुभाष गड्डीगौडर, के.व्ही.पाटील, गुळाप्पा होसमनी, जगदीश कौजगेरी, विजयराज उपाध्याय, रमेश, बसवराज शिग्गमवी, श्रीकांत मालेगौडर आदि  उपस्थित होते.

  • शिरसंगी श्री कालिकादेवी मंदिरात विशेष पूजा :

शिरसंगी श्री कालिकादेवीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा केली आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.मातृभूमीतील सर्व जनतेला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देण्याचा संकल्प केला. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, पक्षनेत्या रत्ना मामाणी, विरुपक्षप्पा मामणी, इराण्णा चंद्रगी, गुळाप्पा होसमनी, महांतेश पंचन्नावर, सिद्धप्पा मुनवळ्ळी, उमेश दंडीन, संकणगौडा पाटील, फकीरप्पा ओगलपुर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात विशेष पूजा : 


सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात देवीची विशेष पूजा करून भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. श्री रेणुका देवी मंदिर हे सौंदत्तीमधील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे बेळगाव जिल्ह्यातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. आईचे आशीर्वाद सर्वांना मिळावेत आणि देश समृद्ध व्हावा, असा संकल्प त्यांनी केला.

यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेत्या रत्ना मामणी, विरुपाक्ष मामाणी, मुरुगेंद्र पाटील, के.व्ही. पाटील, एस.आर. सिद्दनगौद्रा, विरुपाक्ष मानसी, बसप्पा सिद्दक्कनवरा, यल्लाप्पा कलन्नावर,  कृष्णप्पा लमाणी आणि सौंदत्ती गावातील इतर उपस्थित होते.

  • हुली मठाला भेट देऊन श्री उमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले :

बेळगाव लोकसभा मतदार संघातील सौंदत्ती तालुक्याच्या हुली मठाला भेट देऊन जगदीश शेट्टर यांनी हुली मठाचे श्री उमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. 


यावेळी जिल्हाध्यक्ष  सुभाष पाटील, नेत्या रत्ना मामणी, विरुपाक्ष मामणी, मुरगेंद्र पाटील, हुली गावचे गुरु हिरीये, श्री मठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

  • अरळीकट्टीतील श्री शिवमूर्ती स्वामीजींची भेट घेऊन घेतला आशीर्वाद :


जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील अरळीकट्टी गावातील श्री शिवमूर्ती स्वामीजींची भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.



यावेळी माजी आमदार संजय पाटील, मनोहर कडोलाकर, जिल्हाध्यक्ष श्री.सुभाष पाटील, नेते मुरुगेंद्र पाटील, शंकरगौडा पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, पक्षाचे नेते, गावातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • बडेकोळ मठाचे नागय्या अज्जन यांची भेट घेऊन घेतला आशीर्वाद :


बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बडेकोळमठाचे नागय्या अज्जन यांची भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.

यावेळी माजी आमदार संजय पाटील,  मनोहर कडोलकर , ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष  जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेते मुरुगेंद्र पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, मंजू धरणेन्नवर,सनथकुमार, शंकरगौडा पाटील, मंजुनाथ कुंभार, अशोकगौडा व इतर पक्षाचे पदाधिकारी गावातील जेष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • निलजी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिराला भेट देऊन घेतला आशीर्वाद :


जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील निलजी गावच्या ब्रह्मलिंग मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, मनोहर कडोलकर, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेते मुरगेंद्र पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, नितीन चौगुले, यल्लेश कोलकार, वीरभद्रय्या पुजारी किरण पाटील,  वसंत पाटील, भरमा गोमनाचे, गंगाराम मुतगेकर, भरत पाटील, लक्ष्मण, चंद्रकांत पाटील, मारुती गाडेकर, सुनिल पाटील व निलजी उपस्थित होते.

  • कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री जयमृत्युंजय स्वामीजी यांची भेट घेऊन घेतले आशीर्वाद :



बेळगाव येथे कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री जयमृत्युंजय स्वामीजी यांची भेट घेऊन जगदीश शेट्टर यांनी  त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार तथा भाजप ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील, खा.मंगला सुरेश अंगडी, माजी विधान परिषद सदस्य श्री.महांतेश कवटगीमठ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्र पाटील व पक्षाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 

  • सांबरा श्री यल्लम्मा देवी मंदिरात विशेष पूजा : 

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सांबरा गावातील श्री यल्लम्मा देवी मंदिरात जाऊन जगदीश शेट्टर यांनी पूजा केली आणि आशीर्वाद घेतले.

यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेते मुरुगेंद्र पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, दादा गौडा पाटील, राजू देसाई, मल्लप्पा कांबळे, श्री. मारुती जोगन्नी, श्री.मनोहर जुई, श्री.विलास कानगावकर.पक्षाचे पदाधिकारी, सांबरा गावातील ज्येष्ठ व नेते उपस्थित होते.

  •  पंत बाळेकुंद्री गावातील पंत महाराज संस्थान मठाला भेट :


बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री गावातील पंत महाराज संस्थान मठाला भेट देऊन  जगदीश शेट्टर यांनी श्री पंत महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेते मुरुगेंद्र पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, दादागौडा पाटील, यल्लेश कुलकारा, विजया जाधव, श्री. आदिवेश अंगडी, श्री.शंकर मल्लन्नवार व इतर पक्षाचे पदाधिकारी.बाळेकुंद्री गावातील ज्येष्ठ व नेते उपस्थित होते.

  • सुळेबावी येथील श्री लक्ष्मी मंदिरात विशेष पूजा :

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे  उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सुळेबावी येथील श्री लक्ष्मी मंदिरात जाऊन श्री लक्ष्मीची विशेष पूजा करून आशीर्वाद घेतले.  


यावेळी माजी आमदार  संजय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनाके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नेते मुरुगेंद्र पाटील, युवराज जाधव, धनंजय जाधव, दादागौडा पाटील, रमेश पाटील,सरवदे,  पुंडलिक  मुरारी,  वीरभद्र नेसरगी व पक्षाचे इतर पदाधिकारी, सुळेबावी गावातील ज्येष्ठ नागरिक व नेते उपस्थित होते.