•  परीक्षेकरिता भेट म्हणून पॅडचे वितरण 

बेळगाव : समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उद्यापासून दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी माधुरी जाधव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता भेट म्हणून पॅड वितरित केले. तसेच  परीक्षेमध्ये चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे याकरिता शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी प्रदीप कडोलकर यांनी मुलांना बोर्ड परीक्षा आणि पुढील शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. उद्या सोमवार दि.  २५ मार्च रोजी दहावीच्या परीक्षा सुरु होत आहे.  त्याचबरोबर उद्या परंपरेप्रमाणे शहरामध्ये रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर रंग उधळू नये असे आवाहन समाजसेविका  माधुरी जाधव यांनी जनतेला केली आहे.