• सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची लाईव्ह पत्रकार परिषद

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या सार्वत्रिक  लोकसभा व काही विधानसभांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची उद्या दिनांक १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सदर माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून सर्वच पक्षांनी युद्धपातळीवर मोर्चे बांधणीस प्रारंभ केला आहे. उमेदवार निवडीपासून ते आघाडीपर्यंतची सर्वच तयारी स्वराज सुरू आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. २०१९ मध्ये पार पडलेल्या  निवडणुका या ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत झाल्या होत्या. या निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागला होता. आता २०२४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभाग उद्या दुपारी जाहीर करणार असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींचा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.