- सुदैवाने अनर्थ टळला
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून आग विझवल्याने सुदैवाने संगणक, सरकारी रेकॉर्डचे कोणतेही नुकसान झाले नाही. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून आग विझवली.
त्यामुळे सुदैवाने कार्यरत कर्मचारी व संगणक, सरकारी रेकॉर्डचे कोणतेही नुकसान झाले नाही. उप-नोंदणी कार्याल शॉर्टसर्किटबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना कार्यालयातील कर्मचारी अक्षय मडिवाळर यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटने पंख्याला स्पार्किंग होऊन आग लागली. कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवल्याने ती जास्त पसरली नाही. दुपारनंतर कार्यालय बंद ठेवून सारे काही ठीक आहे का नाही याची तपासी करणार आहोत. उद्यापासून नेहमीप्रमाणे कामकाज सुरु राहील, असे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती देताना बेळगाव विभागीय कावेरी-२ सॉफ्टवेअर्स सहाय्यक व्यवस्थापक रामकृष्ण टी. एम. म्हणाले की, बेळगाव उत्तर मतदारसंघातील उपनिबंधक कार्यालयातील पंख्याजवळ शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे सर्वांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, कुणालाही काहीही झाले नाही. फर्निचरचे किरकोळ नुकसान झाले. उद्यापासून नेहमीप्रमाणे कामकाज सुरु राहणार आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान शेकडो ग्राहक, वकील, खरेदीदार आणि विक्रीदारांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेल्या सब रजिस्ट्रार कार्यालयात लागलेल्या आगीची चर्चा दिवसभर डीसी कंपाऊंड परिसरात सुरु होती.
0 Comments