- सौंदत्ती येथील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
पोहण्यासाठी गेलेला एक तरुण नदीत बुडाला असून तज्ज्ञांचे पथक बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहे. मंगळवार (दि. १९ मार्च) रोजी सौंदत्ती येथील मलप्रभा नदीच्या ठिकाणी ही घटना घडली. अनिल फकीराप्पा लगमन्नवर (वय १८ रा. कोल्लार ओणी) असे त्या तरुणाचे नाव असून तो बारावीचा विद्यार्थी होता. बुधवारी त्याला सामाजिक शास्त्र विषयाची परीक्षा द्यायची होती.
मंगळवारी दुपारी तो मित्रांसोबत नदीत पोहायला गेला असता नीट पोहता येत नसल्याने नदीत बुडाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच उडपी येथील आपत्कालीन सेवा देणारे ईश्वर मालपे यांच्यासह रुग्णवाहिका सौंदत्ती येथे घटनास्थळी पोहोचली असून नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहेत. शोधकार्यात अग्निशामक दल आणि पोलिस विभागाचे त्यांना सहकार्य लाभत आहे.
दरम्यान आमदार विश्वास वैद्य यांनी घटनास्थळी दाखल होत तरुणाच्या पालकांचे सांत्वन केले. तसेच तज्ञांना तातडीने तरुणाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
0 Comments