मुंबई : अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या वाय. बी. सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसोबतच्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक आणि उमेदवारा संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
- विजय वडेट्टीवारांची टीका
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अशोक चव्हाण राजीनाम्यावरुन भाजपवर टीका केली. स्वत:च्या कामगिरीवर जिंकता येत नाही, इतर पक्ष फोडून घर सजवण्याचे काम सुरु आहे असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसंबंधी प्रभारींशी चर्चा होणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच एक नेता गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
0 Comments