बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या राजश्री जैनापूर आज पदभार स्वीकारला. निवडणुकीमुळे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची रायचूर शहरात बदली करण्यात आली.शासनाने नुकताच त्यांच्याजागी राजश्री जैनापूर यांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. राजश्री जैनापूर यांनी यापूर्वी बेळगाव येथील उपविभागीय अधिकारी व राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकारीपदी काम केले आहे. 

महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांच्याहस्ते त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभावती मास्तमर्डी , नगरसेवक रवी साळुंके, अजीम पटवेगार, शाहिद पठाण, रेश्मा बैरकदार, बाबाजान आदींसह नगरसेवक उपस्थित होते.