- जिल्हा पोलिसप्रमुख ऋषिकेश सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
विजयपूर : विजयपूर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विजयपूर जिल्हापोलिस प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी विजयपूर आदर्श नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, ताब्यात घेतलेल्या दोघांकडून सुमारे ४२.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आदर्शनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणांचा तपास यशस्वी तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला त्यांनी रोख बक्षिस जाहीर केले आहे.
0 Comments