बेळगाव :  महापौर - उपमहापौर  निवडणुकीनंतर  बेळगाव महापालिका आयुक्तपदी पीएन लोकेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. पीएन लोकेश हे बागलकोट जिल्ह्याचे विशेष जिल्हाधिकारी होते. दोन दिवसांत ते अधिकृतपणे बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील असे कळविण्यात आले आहे. 

तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची अन्यत्र बदली केल्याने रिक्तजागी राजश्री जैनापूर यांची प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.