विजयपूर / वार्ताहर 

दावणगेरे येथे पत्रकारांच्या ३८ व्या राज्य परिषदेत कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाने (KUWJ) विजयपूर जिल्हा असोसिएशनला सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेचा पुरस्कार देऊन गौरविले.विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, केयूडब्ल्यूजेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद तागदुर व पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश टी. चुरी यांनी या पुरस्काराने त्यांचा गौरव केला.  

यावेळी असोसिएशनचे महासचिव मोहन कुलकर्णी उपाध्यक्ष इंदुशेखर मनूर,प्रकाश वेन्नूर,राज्य समिती सदस्य डी. बी.वडवदगी कोषाध्यक्ष राहुल आपटे कार्यकारी समिती समीर इनामदार शशिकांता मेंढेकर माधव कुलकर्णी. देवेंद्र हळुवार सचिंद्र लंबू  केके कुलकर्णी गोपाळ कनिमणी सीताराम कुलकर्णी सदस्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.