बेळगाव : प्रसारमाध्यमांपैकी एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचा प्रमुख असल्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात लुबाडणाऱ्या एका बनावट पत्रकाराला मंगळवारी बेळगावात अटक करण्यात आली.
रमजान मुजावर असे त्या तोतया पत्रकाराचे नाव आहे. अथणी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात एका प्रसिद्ध मराठी वृत्त वाहिनीचा महाराष्ट्र पश्चिम विभागाचा प्रमुख असल्याचे सांगून तो लोकांना लुबाडत होता.
ही बाब त्या वृत्तवाहिनीच्या कन्नड वाहिनीचे बेळगाव जिल्हा प्रतिनिधी सहदेव माने यांच्या लक्षात येताच त्यांनी शहरातील साहित्य भवन येथे त्या तोतया पत्रकाराला गाठले. त्यानंतर शहर पोलीस आयुक्तांना माहिती देऊन त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात त्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात बनावट पत्रकारांचा त्रास जास्त असून पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments