बेळगाव : यश इव्हेंट आयोजित ऑटो एक्स्पोचा सीपीएड मैदानावर दि 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये 220 स्टाॅलची मांडणी करण्यात आली आहे.
ऑटो एक्स्पोमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एडीएमएस, क्वांटम, बीगाॕस, अॕंपीएर, ओकाया, हिरो, निओ नाईस, टीव्हीएस या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक विविध प्रकारची दुचाकी वाहने प्रदर्शित होणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक मोटर सायकलही या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. तसेच प्रदर्शनात तात्काळ बुकींगवर खास आकर्षक सूट देण्यात येणार आहे.
ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल सोल्युशन्स, डिझाईन, टिकाव आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सचे अनावरण आणि श्रेणी पाहण्यास मिळणार असून ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करून इलेक्ट्रिक वाहनांपासून ते लक्झरी कारपर्यंत अत्याधुनिक ऑटोमोबाईल्सच्या प्रदर्शनात स्वतःला मग्न करा. प्रदर्शनातील लक्झरी वाहने आणि स्पोर्ट्स बाईक हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे आणि बाईक स्टंट शो आयोजित केला जाणार आहे.अशी माहिती यश इव्हेंटचे अजिंक्य कालकुंद्रीकर, प्रकाश कालकुंद्रीकर व विनय कदम यांनी दिली.
0 Comments