संकेश्वर / वार्ताहर 

तरुण वकिलावर हल्ला करणाऱ्यासह अन्य हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी संकेश्वरच्या वकिलांनी येथील पोलिस स्थानकासमोर निदर्शने केली.यावेळी पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

एका विशिष्ट समुदायातीलव्यक्तिला पाठिंबा देत असल्याच्या कारणावरून संकेश्वर येथील तरुण वकिलावर हल्ला करण्यात आला होता. मात्र या घटनेनंतर हल्लेखोरांना अटक करण्यात दिरंगाई केल्याबद्दल वकिलांनी  पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे.