•  यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री काळभैरी देवाचे दर्शन

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे ग्रामदैवत व सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची वार्षिक यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली.  


महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील लाखो भाविकांनी श्री काळभैरवाचे दर्शन घेतले. "भैरीच्या नावानं चांगभलं"च्या अखंड गजराने डोंगर परिसरात भक्तीचा मळा फुलला होता.