बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठा मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व दिगंबर पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्याहस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.आबासाहेब दळवी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
म. ए. समिती महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर, मराठा मंदिरचे बी. ओ. येतोजी, सी. ए .तुकेश पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, तालुकाप्रमुख मनोहर हुंदरे, किरण मोदगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मराठा मंदिराचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब गुरव यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास २००० व महाविद्यालयीन सत्रात जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेनंतर उपस्थित शिक्षकवर्गाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे व युवा समितीचे कौतुक करत अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत तसेच मराठी भाषा आणि शाळा वाचवण्यासाठी युवा समितीची धडपड कौतुकास्पद आहे आशा भावना व्यक्त केल्या.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी आकाश भेकणे, आनंद पाटील, साईनाथ शिरोडकर, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, प्रतीक पाटील, निखिल देसाई, ज्योतिबा पाटील, प्रवीण धामणेकर, अक्षय बंबरकर, सौरभ तोंडले, अविनाश चौगुले, रितेश पावले, महेश चौगुले, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, विनायक कावळे, दत्ता पाटील, अशोक पाटील, विकास भेकणे शुभम भेकणे आदी उपस्थित होते
0 Comments