गोकाक : शॉर्टसर्किटमुळे चार घरांना आग लागून घरातील २०० ग्रॅम सोने व १ लाख रुपयांची रोख रक्कम व इतर साहित्य जळून खाक झाले.
गोकाक तालुक्यातील शिंगळापुर गावात घटप्रभा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली .अझुम पीरजादे, कय्युम पीरजादे, नयूम पीरजादे, इसामुद्दीन पीरजादे अशी नुकसानग्रस्त घरमालकांची नावे आहेत. या घटनेची नोंद घटप्रभा पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments