बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षीप्रमाणे रेणुकादेवी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात्रा पुढील प्रमाणे साजरी होणार आहे. रविवार दि. १८ फेब्रवारी  २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. गावातून सौंदत्ती येथे  रेणुकादेवीला जायचे आहे. मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ डोंगरावरील पडली (पडल्या) भरणे.  बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गावी परतणे आणि लक्ष्मी देवस्थानजवळ मुक्काम करणे, गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गावातीललक्ष्मी देवस्थानजवळ पडल्या (पडली) भरणे कार्यक्रम झाल्यानंतर (मारग) मळणे  अशा पद्धतीने यात्रा संपन्न होईल. 

शनिवार दि. २४ फेब्रुवारी  सायंकाळी  ४ वाजता ब्रम्हलिंग देवस्थानचा इंगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वरील नियोजन प्रमाणे यात्रा साजरी करावी असे आवाहन ग्रामपंचायत कमिटीने केले आहे. तसेच सर्व ग्रामस्थांना रेणुका देवीच्या यात्रेच्या तसेच इंगळ्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.