शिंदोळी (ता.बेळगाव) येथील देवेंद्र जिनगौंडा स्कूलमध्ये मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी समाज विज्ञान विषय स्कोरींग पॅकेज कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव ग्रामीणचे बीईओ एस. पी. दासपन्नावर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्र समन्वय अधिकारी डॉ. एम. एस. मेदार हे उपस्थित होते. समाज विज्ञान विषयात विद्यार्थ्यांनी ८० पैकी ८० गुण मिळवून १०० गुण मिळविण्याच्या ध्येयपूर्तीसाठी समाज विज्ञान विषयातील तज्ञ शिक्षकांच्यातर्फे स्कोरींग पॅकेज तयार करण्यात आले होते. सदर पॅकेजमध्ये बहुपर्यायी प्रश्नोत्तर, लघु प्रश्नोतरे, दिर्घ प्रश्नोतरे व नकाशा रेखाटून स्थळे दाखविणे यासारख्या सर्व मुद्यांचे विवेचन सदर पुस्तिकेमध्ये करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. याकरिता परीक्षेपूर्वी सर्व शाळातील विद्यार्थ्यांना समाज विज्ञान स्कोरींग पॅकेज पोहचावे म्हणून सदर पुस्तिकेचे प्रदर्शन तातडीने करावे लागले. ही पुस्तिका तयार करण्यासाठी समाज विज्ञान कार्यशाळेमध्ये सन्माननीय क्षेत्र शिक्षणाधिकारी व समन्वय अधिकारी तसेच समाज विज्ञान पर्यवेक्षक उपनिर्देशक कार्यालय बेळगांव यांच्या सुचनेप्रमाणे सदर पॅकेज करण्यास सुरुवात करण्यात आली. हे स्कोरिंग पॅकेज तयार करण्यासाठी साधारणता २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागला. सदर पुस्तिका तयार करण्यासाठी समाज विज्ञान विषय तज्ञशिक्षक एम.पी. कंग्राळकर व इतरांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
सदर कार्यक्रमात डॉ. एम. एस. मेदार यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्कोरींग पॅकेजची विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी ही सदर पुस्तिका मार्गदर्शिका म्हणून वापरात घ्यावी असे उद्गार काढले. तर एम. बी. बाचीकर यांनी विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत १०० पैकी १०० गुण घ्यावेत यासाठी ही मार्गदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. ती सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमच्या समाज विज्ञान फोरमच्यावतीने पूर्ण करण्यात येईल असे सांगून सदर प्रदर्शन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला एम.पी. कंग्राळकर, एम. बी. बाचीकर, आर. पी. पाटील, बी. बी. दिवटे, एस. पी. हलगेकर, वी.एल झंगरूचे, एस. एस. गवास. उमेश जाधव, पी. पी. गोरल , रेखा पाटील, वैदेही जाधव, लती पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments