बेळगाव : कुद्रेमानी रवळनाथनगर (ता. बेळगाव) येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ कार्यकर्ते नागोजी यल्लोजी हुलजी (वय १०२ वर्षे) यांचे आज रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, बहीण, सुना, जावई, नातंवडे  व पणंतवडे असा परिवार आहे. उद्या सोमवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा. कुद्रेमानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.सीमालढ्यात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते. 

ब्रह्मलिंग हायस्कुल सुळगे (हिं.) चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र हुलजी यांचे ते वडील तर बेळगावचे बांधकाम व्यवसायिक युवराज हुलजी यांचे ते आजोबा होत.