सुळगा (हिं.) / वार्ताहर 

शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगा (हिं.) येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. अशोक चंद्रू पाटील व श्री. कृष्णा ओमाण्णा पाटील यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भाऊराव आण्णाप्पा गडकरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री. बी. डी.पाटील, संचालक प्रकाश लक्ष्‍मण पाटील, शिक्षणप्रेमी नागरिक बाबू धोंगडे, मारुती कणबरकर, न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम पाटील, ब्रह्मलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी एक छोटीशी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अशोक चंद्रू पाटील हे होते. मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर  यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी न्यू मॉडेल स्कूल व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाषणे देशभक्तीपर गीते व नृत्यांचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना सहशिक्षिका व्ही. सी. अनगोळकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव गडकरी  प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले.सहशिक्षक एन. के. चौगुले  यांनी सूत्रसंचालन तर पी. जी. गोरल सर यांनी आभार मानले.