- बेकवाड व भुत्तेवाडी येथे दोन वेगवेगळ्या घटना
- एकूण २.५ लाख रुपयांचे नुकसान
खानापूर / प्रतिनिधी
शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या फडाला व काजूच्या बागेला आग लागल्याच्या, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळपास २.५ लाखांचे नुकसान झाले. खानापूर तालुक्याच्या बेकवाड व भुत्तेवाडी गावात या घटना घडल्या.
पहिल्या घटनेत बेकवाड येथील शेतकरी जकाप्पा भरमाणी बाळेकुंद्री यांच्या शेतातील ऊसाचे पीक व काजू पीक जळून खाक झाले असून, त्यांचे जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या घटनेत भुत्तेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण नारायण पाटील यांच्या ऊसाच्या फडाला आग लागून त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
0 Comments