बेळगाव / प्रतिनिधी
गोकाक येथील २३ वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुमार कल्लाप्पा कोप्पडा (वय 23, रा. गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावातील रहिवासी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याचा अंदाज घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या तरुणाने सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा घडल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गेली त्यामुळे एकच संभ्रम निर्माण झाला आहे.परंतु युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सदर घटनेच्या ठिकाणी मार्केटचे पोलीस तातडीने दाखल झाले.या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments