बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांचे अभासी तत्वावर निवड झालेल्या दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये होणार असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात येणार आहेत . चौखंदळ नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका पाहता यावी यासाठी गेल्या वर्षी पासून आभासी तत्वावर निवड करून स्पर्धेमध्ये संघाना प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
नीटनेटकेपणा, नियोजनबध्द व्यवस्था व काटेकोर वेळेच्या नियोजनबरोबरच अनुभवी परीक्षक व निकाला बद्दलची पारदर्शकता,यामुळे स्पर्धेने नाट्य क्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केले असून देशातील नामांकित स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा उल्लेख केला जात आहे.
बेळगाव परिसरातील किमान पंधरा ते वीस वर्षापासून खंड पडलेल्या एकांकिका स्पर्धांना उर्जीत आवस्था प्राप्त करून देण्यासाठी गेली अकरा वर्षे प्रामाणिकपणे संस्था कटिबध्द आहे .प्रदीर्घ काळ संस्थेने चालविलेल्या या नाट्य प्रपंच्यामुळे नाट्यरसिकांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून, विविध राज्यातून कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यअविष्करामुळे आंतरराज्य स्तरावर सांस्कृतिक देवाण घेवाणीस वाव मिळत आहे आणि यामुळेच,नवनविन कलाकार, लेखक, दिग्दर्शक निर्माण होण्याचा संस्थेचा उदात्त हेतू सफल होताना दिसत आहे.
बेळगांव परिसरातील नाट्य प्रपंचाला पुन:श उभारी देत शालेय गटातील स्पर्धेचे आयोजन अतिशय लाभदायक ठरत आहे. बेळगाव जिल्हा मर्यादित असलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक स्थानिक शाळांनी सहभाग नोंदविला आहे .
संस्थेने आपल्या संस्थेच्या अर्थकरणावर मजबूत पकड राखीत बेळगांव शहर व परिसरातील नाट्य प्रेमी रसिकांना सदर स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य चळवळ जपता येणार असून, दरवर्षीप्रमाणेच बेळगांवकर जनता व नाट्यप्रेमी रसिक या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देतील अशी अपेक्षा संस्था बाळगून आहे.
- अ. भा. लेखन स्पर्धा संपन्न :
अखिल भारतीय स्तरावर मराठी एकांकिका लेखन स्पर्धा यंदाही संस्थेने आयोजित केली असून सदर स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. सातत्याने भासत असलेल्या संहितांचा तुटवडा व अभाव यासाठी अखिल भारतीय स्तरावर. सदर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.सलग पाचव्या वर्षी देशभरातून स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
- प्रवेश खुला :
सर्वच प्रेक्षकांना सदर स्पर्धा ही विनामूल्य खुली ठेवण्यात आली असून केवळ शिस्तबद्ध आसन व्यवस्थेसाठी प्रेक्षकांनी एकांकिका सुरू असताना नाट्यगृहात प्रवेश करू नये असे संस्थेतर्फे असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा.डॉ.संध्या देशपांडे, प्रा. अरुणा नाईक, सुभाष सुंठणकर यांच्यासह सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे व्हा.चेअरमन शाम सुतार व संचालक रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शिवाजी अतिवडकर,शरद पाटील,संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव ,नंदा कांबळे यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.
0 Comments