- खानापूर तालुका कंत्राटी संघटनेच्या बैठकीत निर्णय
खानापूर / प्रतिनिधी
आज शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार विठ्ठलराव हालगेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे बेळगावचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व खानापूर तालुक्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या सर्वांच्या उपस्थितीत आमदार कार्यालयात बैठक संपन्न झाली. व खालील विषयावर चर्चा करून ठराव मांडण्यात आले.
सद्या खानापूर तालुक्यातील विकास कामे तालुका बाहेरील कंत्राटदारांना पंधरा ते वीस टक्के कमी दराने टेंडर कामे देत आहेत. त्यामुळे सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत असून कामामध्ये व्यवहार होत आहे. तसेच स्थानिक कंत्राटदारांना कामे मिळत नाहीत. अशी माहिती कंत्राटदरानी दिली.
याबद्दल बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना कंत्राटदरांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या, व खानापूर तालुक्यातील कामे स्थानिक कंत्राटदरांनाच द्यावीत व तालुक्या बाहेरील कंत्राटदरानी खानापूर तालुक्यामध्ये टेंडर घालू नयेत असे आवाहन केले.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी तालुक्यातील स्थानिक कंत्राटदरांनाच कामे देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील सर्व कंत्राटदरानी टेंडर कामे व पीस वर्क कामासाठी संघटनेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्व कंत्राटदारांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे संघटने कडून कळविण्यात आले आहे.
0 Comments