• बेळगाव महापालिकेच्या पर्यावरणपुरक प्रकल्पाचे उद्घाटन 
  • नगरप्रशासन मंत्र्यांसह जिल्हा पालकमंत्र्यांच्याहस्ते देण्यात आली चालना 

बेळगाव / प्रतिनिधी   

बेळगाव महापालिकेने शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून रस्ते बनविण्याचा पर्यावरणपुरक प्रकल्प सुरू केला आहे. आज मंगळवारी नगर प्रशासनमंत्री रहीम खान आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते राज्यातील या पहिल्याच प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे पावडर मध्ये रूपांतर करून त्या पावडरचा वापर करून प्रायोगिक पातळीवर महापालिकेसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.

यावेळी प्रकल्पाबाबत माहिती देताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, प्लास्टिक रस्त्याची चाचणी परदेशात यशस्वी झाली आहे. बेळगावात आजपासून या पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. भविष्यात ते विभागाकडून करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्लास्टिक रस्त्याच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, महापालिकेतील सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.