विजयपूर / वार्ताहर 

क्रुझर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, दुचाकी स्वारासह दुचाकीवर पाठीमागे बसलेला अन्य एकजण गंभीर जखमी झाला. आज शनिवारी सकाळी १० वा. सुमारास विजयपूर - सोलापूर मार्गावर सोलापूरनाक्यानजीक ही घटना घडली. जखमींना स्थानिक नागरिकांनी अधिक उपचारासाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, क्रुझर सोलापूर रोडहून विजयपूरकडे येत होती, तेव्हा दुचाकीवरून दोघेजण विजयपूरहून सोलापूरकडे निघाले होते. यावेळी सोलापूर नाक्यानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर क्रुझर चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला आहे.या घटनेची नोंद विजयपूर वाहतूक पोलिस स्थानकात झाली असून पोलिस फरार क्रुझर चालकाचा शोध घेत आहेत.