- अभाविपची मागणी : बेळगाव चन्नम्मा सर्कल येथे अपुऱ्या बस व्यवस्थेविरोधात निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी केएसआरटीसी बसेसची पुरेशी सोय नाही. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल अशा पद्धतीने बसेसची व्यवस्था करावी, या मागणीसाठी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी बेळगाव चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून आंदोलन केले.
या आंदोलनाबाबत बोलताना अभाविपचे जिल्हा समन्वयक प्रशांत शेलकेरे म्हणाले की, खेड्यातून शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची मोठी समस्या आहे. 'शक्ती' योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. वंटमुरी आणि सुळेभावी गावांसाठी जादा बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगितले की, दर अर्ध्या तासाने सुळेभावी साठी एक बस सोडली जात आहे, त्याऐवजी दर १० - १५ मिनिटांनी एक बस सोडली पाहिजे, यामुळे बसमधील गर्दी कमी होऊ शकते आणि आम्हाला कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यास मदत होईल.
या आंदोलनात अभाविपचे जिल्हा समन्वयक प्रशांत शेलकेरे, अभाविपचे विद्यार्थी व शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
0 Comments