सुळगा (हिं.) / वार्ताहर

तुरमुरी (ता. बेळगाव) येथे आज केंद्र सरकारच्या विकसित भारत या अभियानांतर्गत एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांबरोबरच बेळगाव ग्रामीण भाजपचे मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यानंतर ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभाग, बँक अधिकारी, कृषी विभाग यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.