विजयपूर / वार्ताहर 

बेंगळूरहून विजयपूर शहराकडे येत असलेल्या एका खासगी परिवहन कंपनीच्या बसचा टायर अचानक फुटल्याने बसला आग लागली. शहराबाहेरील हितनळळीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर ही घटना घडली. चालकाने तातडीने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवले आणि प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.

यावेळी  जीवाच्या आकांताने घाबरलेले सर्व प्रवासी आपले सामान बस मध्ये सोडून खाली उतरले. यानंतर काही वेळातच  बस संपूर्ण जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास हाती घेतला आहे.