बेळगाव : वेंगुर्ला रोड, सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील रहिवासी श्री. यल्लाप्पा मेघो कलखांबकर (वय ८४) यांचे आज शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज रात्री ८ वा. होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.