• लाखो रुपयांचा अवैध तांदूळसाठा जप्त
  • होरती पोलिसांची कारवाई

विजयपूर / वार्ताहर 

रेशन तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना होरती पोलिसांनी धाड घालून अटक केली. विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील बसनाळ मार्गावर ही कारवाई करण्यात आली. अंजद पठाण अविनाश घुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या प्रकरणातील संभाजी गायकवाड आणि पवन थोटला हे दोन आरोपी फरार आहेत. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ८ लाख २३ हजार ३१० रु. किंमतीचा रेशनचा तांदूळ तसेच वाहतुकीसाठी  वापरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी होरती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.