(बेळगांव राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या संघासमवेत
राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, चंद्रकांत पाटील,मयुरी पिंगट,
शिवकुमार सुतार,यश पाटील बसवंत पाटील)
 

बेळगाव : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे होणाऱ्या ६७ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा हँडबॉल संघ रवाना झाला आहे.

नुकत्याच शिवपुरी मध्य प्रदेश येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावले होते. आता दिल्ली येथे १६ ते २३ डिसेंबर दरमान्य  होणाऱ्या ६७ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संतमीरा शाळेचा संघ  विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या  संघात गोलरक्षक भावना बेरडे,ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर वर्षा परीट, सुहाणी गुदेकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर,स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर, या खेळाडूंचा संघात समावेश आहे. संघासोबत शाळेच्या क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, बसवंत पाटील रवाना झाले आहेत.  या संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, पर्यवेक्षक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहान लाभत आहे.