• लोकायुक्त विभागाची कारवाई 

धारवाड : हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मंजुनाथ आणि कनिष्ठ अभियंता प्रकाश होसमनी यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठेकेदार बाळकृष्ण नायक यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच हावेरी लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार शिग्गावी पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मंजुनाथ आणि कनिष्ठ अभियंता प्रकाश होसमनी यांनी हावेरी जिल्ह्यात करावयाच्या रस्त्यांच्या कामाचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदार बाळकृष्ण नायक यांच्याकडे एक लाखाची लाच मागितली होती. यापूर्वी रस्त्यांच्या कामाचे पहिले बिलही या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारूनच मंजूर केले होते. याबाबत ठेकेदार नायक यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार हे पैसे घेताना लोकायुक्तांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.