सुळगा (हिं.) / वार्ताहर
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या सुळगा (हिं.) येथील हरे कृष्ण प्रचार केंद्राच्यावतीने उद्या शुक्रवार दि. २९ व शनिवार दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी लक्ष्मी गल्ली, सुळगा (हिं.) येथे हरे कृष्ण महोत्सव - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गावात हरीनाम नगर संकीर्तन तर शनिवार दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वा हरिनाम संकीर्तन, ६.३० ते ७ सांस्कृतिक कार्यक्रम (नृत्य, भजन), ७ ते ८ प्रवचन (इस्कॉनचे वरिष्ठ प्रभुजीद्वारे), ८ ते ९ नाट्यलीला (चिन्हापट्टण, पिरणवाडी भक्तमंडळी), रात्री ९ वा. महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.
सदर हरे कृष्ण महोत्सव, हरे कृष्ण प्रचार केंद्र, सुळगा, देवस्की पंच कमिटी, ग्रामपंचायत सुळगा, सर्व युवक मंडळे, सर्व महिला मंडळे, व समस्त गावकरी मंडळी सुळगा यांच्या व्यवस्थापन आणि सहाय्याने होणार आहे.
ज्या भाविकांना महाप्रसादासाठी लक्ष्मी रूपाने किंवा धान्य रूपाने सेवा करायची आहे. त्यांनी मो. 9421248273, 8880459698, 9902687447 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments