- रस्त्याची पुनर्बांधणी करा
- महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांची मागणी
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर - अनमोड व्हाया या हेम्माडगा रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव आबासाहेब दळवी व या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लवकरात लवकर रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खानापूर - अनमोड व्हाया हेम्माडगा हा रस्ता पूर्णत: खराब झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले होते. यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच या भागातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला हा रस्ता तातडीने खड्डे मुक्त वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा अन्यथा रास्तारोको चा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी हा रस्ता दुरुस्त करण्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र खानापूर ते अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्याची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्यात यावी हा रस्ता गोव्याला अत्यंत जवळचा असून या रस्त्यावरून वाहतूक झाल्यास प्रवाशांना सोयीचे होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याचे पूर्णपणे नव्याने बांधकाम करण्यात यावेत अशी मागणी आबासाहेब दळवी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केली आहे. मात्र सद्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments