• रामनगर पोलिसांची कारवाई 

खानापूर / प्रतिनिधी 

रामनगरनजीक सितावाडा येथे दि. १३ एप्रिल २०२३ रोजी लक्ष्मण कदम यांच्या घरी भर दुपारी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना खानापूर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. महादेव नारायण धामणेकर (रा. हलशी ता. खानापूर) ; महादेव बसवराज आजरेकर (रा.नंदगड, ता. खानापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख रु. किंमतीचे १८ तोळे सोने, १८ तोळे चांदी , रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात चोरीची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे  उत्तर कन्नड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिसप्रमुख सी. टी. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दांडेली उपविभागीय पोलिस उपअधिक्षक शिवानंद कटगीरा यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक डी. एस. नाईक, आर. के. दोडमनी, मंजुनाथ चौरथ, देविदास उड्डगी, तनोज इरांणा, अखिलेश, नामदेव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.