- सासपिंजराच्यावतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन
- मनोरंजन व खेळाच्या माध्यमातून दिला निरोगी आरोग्याचा कानमंत्र
बेळगाव / राजश्री पाटील
बालदिनाचे औचित्य साधून हिंडलगा, दाजीबा देसाई मार्गावरील गीताज लव्हडेल नर्सरीत सास पिंजराच्या माध्यमातून नुकताच एक संस्मरणीय कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातून सासपिंजराने लहान मुले, तरुण आणि पालकांना निरोगी आयुष्य जगता यावे, यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. हरप्रीत कौर यांची उपस्थिती लाभली. यावेळी लहान मुलांनी भिंतीवरील कागदांवर हाताचे ठसे उमटवून निरोगी आरोग्य जगण्याची प्रतिज्ञा केली.
यानंतर डॉ. हरप्रीत कौर यांचे निरोगी जीवनशैली व मुलांचे पोषण या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात त्यांनी मुलांची निरोगी वाढ व्हावी याकरिता घ्यायची दक्षता तसेच संतुलित आणि सकस आहार कसा असावा यावर मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिला पालकांनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचे त्यांनी निरसन केले.
कार्यक्रमादरम्यान वाढत्या मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार असलेल्या सास पिंजराच्या 'बीट रूट माल्ट' या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा स्पर्धेमधील विजेत्या मुलांना तसेच शिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सास पिंजरातर्फे पालकांसाठी हर्बल उत्पादनांवर बोनस कूपनसह २० टक्के विशेष सूट देण्यात आली होती.
एकंदरीत बालदिनाच्या औचित्याने गीताज लव्हडेल नर्सरी आणि सास पिंजराच्यावतीने आयोजित केलेला हा आरोग्य विषयक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
0 Comments