बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक येत्या बुधवार दि. २२ नोव्हेंबर  २०२३ रोजी दुपारी तीन वाजता बोलावण्यात आली आहे.

बेळगाव येथे येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सदर महामेळाव्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.