- बेळगाव आयकॉनिक ॲकॅडमी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजन
बेळगाव : बेळगाव आयकॉनिक ॲकॅडमी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी कलमेश्वर मंदीर जुने बेळगाव येथे सकाळी ६ वा. भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सुरेश साताप्पा कुरबर हे सदर स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिला खुला गट तसेच १६, १४, १२ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटांमध्ये होणार आहे.
पुरुष व महिला खुल्या गटासाठी (रु. १५०/-), १६ वर्षांखालील मुला - मुलींच्या गटासाठी (रु. १००/-), १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटासाठी (रु.५०/-), १२ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटासाठी (रु.५०/-) प्रवेश फी आकारण्यात येणार आहे.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कमेची भव्य पारितोषिके दिली जाणार आहेत. तरी अधिक माहितीसाठी ६३६१४४८७३७, ९१४८५१३३८५, ७८२९४२७६१२, ८४३१३५४०२० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले असून नाव नोंदणी ठीक ५.३० वा. स्पर्धेच्या ठिकाणी केली जाईल असे कळविण्यात आले आहे.
0 Comments