खानापूर / प्रतिनिधी
घरावर पत्रे घालताना तोल जाऊन खाली पडल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कौंदल (ता. खानापूर) येथे आज गुरुवारी सकाळी १०.३० वा. ही घटना घडली. अनंत मारुती कुरूमकर (वय ३६) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, अनंत मारुती कुरूमकर यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असून ते एका घरावर फॅब्रिकेशनचे काम करत होते. त्यावेळी पत्रे चढवत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.
उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. खानापूर पोलीस स्थानापती या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments