- वाहनांची तपासणी : चारचाकी वाहनांवर नजर
कोगनोळी / वार्ताहर
कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर पोलिसांच्या वतीने दिवसभर बंदोबस्त ठेवला होता.
१ नोव्हेंबर कर्नाटक राज्याचा राज्यसह असला तरी मराठी भाषिक लोक काळा दिन म्हणून साजरा करतात. लगतच असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावला जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाच्या वतीने, कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करूनच त्यांना कर्नाटक प्रवेश दिला जात आहे. सकाळी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यानंतर दिवसभर याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक जी. बी. गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह अन्य पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. १ पोलीस उपअधीक्षक, १ मंडल पोलीस निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ८० पोलीस तैनात करण्यात आले होते.
0 Comments